
‘या’ आमदाराने दिला राजीनामा, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार प्रवेश
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार, अशा चर्चा एकीकडे सुरु असताना दुसरीकडे मात्र शरद पवारांच्या समर्थकाने त्यांची साथ सोडली आहे. आमदार चव्हाण आता अजित पवार यरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिला आहे. उद्या शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन होत आहे. याच कार्यक्रमामध्ये चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये होते. मात्र निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा ते अजित पवारांच्या पक्षामध्ये येत आहेत.
चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रातून महायुतीला घरचा आहेर दिला होता. जवळपास दीड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला. तथापि, मराठा, ओबीसी, धनगर यांच्या आरक्षणासह बहुजनांचे प्रश्न हे सरकार सोडवू शकले नाही, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. चव्हाणांच्या या पत्राची प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी त्यावेळीच दखल घेतली होती. पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार आमदार चव्हाण यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याचे तटकरे यांनी आज प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले.
त्यानंतर त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला होता. आता पुन्हा आमदार चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन होत आहे. त्यामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे.