
निकषांमुळे डोकेदुखी वाढली, 1500 रुपये घेण्याआधी SelfDeclaration द्यावं लागणार?
लाडक्या बहिणींना आता दणका देणारी बातमी आहे. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या वेगवेगळ्या निकषांवर चर्चा होत आहेत. अनेक महिलांचे अर्ज निकषात बसत नसल्याने बाद झाले आहेत. तर आता लाडक्या बहिणींना धक्का बसेल अशी बातमी आहे.
लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवर पाणी सोडावं लागणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर आता बोट ठेवण्यात आलं. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो, असा निकष आहे. तरीपण, या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत आहेत. ‘लाडकी बहीण’मुळे निराधारांच्या अनुदानाला खोडा घातला जातोय. नोव्हेंबरपासून आधाराच्या रकमेची प्रतीक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर आता बोट ठेवण्यात आलं.
या योजनेला लाभ घेतला तर मिळणार नाही लाडकी बहीणचे पैसे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर आता बोट ठेवले जात आहे. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो, असा निकष आहे. तरीपण, या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याने आता 65 वर्षापर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेच्या महिला लाभार्थीना, यापैकी नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा, याचे स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे.
लाडकी बहीणचे निकष काय आहेत?
महिलांचं उत्पन्न 2.5 लाखहून कमी असावं
महाराष्ट्रातील रहिवासी असावी, जर लग्न करुन महाराष्ट्राबाहेर गेली तर मात्र ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही
लाभार्थीचं वय 21 ते 65 असावं
लाभार्थीकडे गाडी नसावी, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं अर्ज करणाऱ्यांचे अर्ज बाद होणार
आधार कार्ड, बँकेच्या नावात तफावत असेल तरी अर्ज बाद होणार
कोणतीही तक्रार दाखल झाली तरच फेरतपासणी केली जाणार आहे. ज्यांच्या अर्जाची छाननी बाकी आहे त्यांचं काटेकोरपणे छाननी केली जाणार आहे. ज्या महिलांचं उत्पन्न वाढलेलं आहे त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेऊ नये अशी विनंती अजितदादांनी केलीय. गरजू महिलांसाठी या योजनेचा लाभ आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं ते ठरवा असंही ते म्हणाले.