आजाराचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनीच घेतला मोठा निर्णय
पुण्यात जीबीएसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या पुण्यात 163 संशयित जीबीएस रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये 5 संशयितांचा मृत्यू झालाय.
तर 21 रूग्ण व्हेंटिलेटवर आहेत. हे रुग्ण सापडत असताना काहीच दिवसांपूर्वी पुणे महापालिकेने शहरातील टॅकरच्या पाण्याचे आणि आरओ प्लांटची तपासणी केली होती. या तपासणीत पुण्यातील पाणी दुषित आढळून आले होते. त्यामुळे पुणेकरांना मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरत आता पुणेकरांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणेकरांनी थेट आता बाटलीबंद पाण्याचा वापर सूरू केला आहे. जेणेकरून जीबीएसचा प्रादुर्भाव टाळता येईल.
इंडियन एक्सप्रेसने या संदर्भात वृत्त दिले आहे. जीबीएस हा आजार पाण्यामुळे होत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता पुणे महापालिकेने पाण्याची नमुने तपासले होते. या तपासणीत पुण्यातील पाणी दुषित आढळून आले होते. त्यानंतर आता जीबीएस आजाराचा धोका टाळण्यासाठी पुणेकरांनी बाटलीबंद पाण्याचा वापर करण्यास सुरूवात केली आहे.
खरं तर जीबीएसचा पुण्यात धोका वाढण्यापुर्वी किराणा दुकानात 56 ते 75 टक्के बाटलीबंद पाण्याची विक्री व्हायची. पण जेव्हा लोकांना हे कळले की हा आजार पाण्याद्वारे पसरतो, तेव्हा बाटलीबंद पाण्याच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली. माझ्या दुकानातील मिनरल वॉटरची विक्री आता 80 ते 87 टक्क्यांवर पोहोचली आहे. साधारण 10 रुपयांच्या 10 हजारहून अधिक बाटल्या विकल्या जात आहेत आणि सुमारे 8 हजार 500 ते 8 हजार 900 रुपयांच्या 20 बाटल्या विकल्या जातायत, असे कर्वे नगरमधील दुकानदार अनिल कदम सांगतात.
रेस्टॉरंट्स आणि फूड आउटलेट्समध्येही ग्राहकांच्या पसंतींमध्ये लक्षणीय बदल दिसून आला आहे. डेक्कनमधील जोशी वाडेवाले येथील व्यवस्थापक 46 वर्षीय सागर चंद्रमुकेश म्हणाले, “येथे येणाऱ्या वृद्ध, तरुण आणि प्रौढांना नियमित पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्यास स्वच्छ आणि शुद्ध पाणी दिले जाते. अन्यथा, त्यापैकी बरेच जण पॅक केलेले बाटलीबंद पाणी निवडतात.
पुण्यात अलिकडेच झालेल्या जीबीएसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, कमिन्स कॉलेजमधील अनेक विद्यार्थी त्यांच्या पिण्याच्या पाण्याबाबत अधिकाधिक सावध झाले आहेत. विशेषतः पीजी आणि वसतिगृहात राहणारे विद्यार्थी सुरक्षिततेच्या कारणास्तव बाटलीबंद पाणी पसंत करतात, असे कमिन्स कॉलेजजवळील पिण्याच्या पाण्याचा पुरवठादार असलेल्या 39 वर्षीय ऋतुजा मोरे म्हणाल्या आहेत.
शिवाजी नगरमधील किराणा दुकानाचे व्यवस्थापक 68 वर्षीय जय महाजन म्हणाले, “आज लोकांसाठी सर्वात मोठी चिंता ही आहे की ते पिणारे पाणी खरोखरच सुरक्षित आहे की नाही. नळाच्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल वाढत्या शंका असल्याने, अधिकाधिक लोक मनःशांतीसाठी बाटलीबंद पाणी निवडत आहेत. शिवाजी नगरमधील माझ्या किराणा दुकानात, मी दररोज हा बदल प्रत्यक्ष पाहतो. विद्यार्थी, काम करणारे व्यावसायिक आणि अगदी कुटुंबे देखील नियमित नळ पुरवठ्यावर अवलंबून राहण्याऐवजी बाटलीबंद पाणी घेण्यासाठी येतात.
