
तब्बल 1500 आधार कार्ड कचऱ्यात फेकले नागरिक हैराण कारवाई होणार का
आधार कार्ड हे सर्वात जास्त शासकीय निमशासकीय योजनेसाठी उपयोगी असणारे कार्ड होय यामध्ये सर्वसामान्य माणसे ॲड्रेस चेंज मोबाईल नंबर व बँकिंग क्षेत्रात देखील कंपल्सरी आधार कार्ड असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आधार कार्डचा वापर करतात मात्र पोस्ट ऑफिसच्या गलथान कारभारामुळे चक्क दीड हजार कार्ड कचऱ्यात पाहायला मिळाले घरपोच सेवा देण्याचे काम पोस्ट कार्यालयाकडून करण्यात येत असल्याने आजही विश्वासार्हता टीकून आहे.
मात्र याच टपाल कार्यालयाकडून धक्कादायक प्रकार झाल्याचे धडगाव तालुक्यात समोर आला आहे.
अर्थात पोस्टामार्फत टाकण्यात आलेले कागदपत्रांचे वाटप न करता ते फेकून देण्यात आले आहे. धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांकडून हा गैर कारभार करण्यात आला आहे.
नंदुरबारजिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या मांडवी पोस्ट ऑफिसमधील वावी, कामोद, काकडदा, घाटली, मखतारझिरा, वलवाल, मांडवी बु., मांडवी खु. तसेच जुगणी पोस्ट ऑफिसमधील निगदी, जुगणी, गोरांबा, मोडलगाव, तेलखेडी. वेलखेडी पोस्ट या गावातील सर्व लोकांचे आधार कार्ड, एटीएम कार्ड, बँकेचे चेक बुक, कोर्ट नोटीस, पॅन कार्ड व इतर महत्वाचे कागदपत्रे वडफळ्याकडे बँक ऑफ इंडिया बँकेचा मागे कचऱ्यात फेकण्यात आले असे निदर्शनास आलेदीड हजाराहून अधिक आधार कार्ड फेकले
फेकलेले कागदपत्र गावातील काही लोकांनी पाहिले असता पोस्ट ऑफिसमध्ये प्रशांत शिंदे, शुभम सोनवळ, प्राशु सोनवणे हे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आली. परंतू पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्याकडून कुठलीच हालचाल दिसून आली नाही. धडगाव तालुक्यातील लोकांना त्यांचे कागदपत्र वाटप होत नसल्याने काही लोकांकडे ओरिजनल आधार कार्ड नाहीत. तसेच फार लोकांना माहिती नसते की आपले महत्वाचे कागद पोस्ट ऑफिस मध्ये येऊन पडले आहेत आणि त्यांचा पर्यंत हे कागद पोहचत नाहीत. यामध्ये दीड हजाराहून अधिक आधार कार्ड फेकले आहेत.
नंदुरबार सतीश चोंडी प्रतिनिधी..
आधार कार्ड हे सर्वात जास्त शासकीय निमशासकीय योजनेसाठी उपयोगी असणारे कार्ड होय यामध्ये सर्वसामान्य माणसे ॲड्रेस चेंज मोबाईल नंबर व बँकिंग क्षेत्रात देखील कंपल्सरी आधार कार्ड असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आधार कार्डचा वापर करतात मात्र पोस्ट ऑफिसच्या गलथान कारभारामुळे चक्क दीड हजार कार्ड कचऱ्यात पाहायला मिळाले घरपोच सेवा देण्याचे काम पोस्ट कार्यालयाकडून करण्यात येत असल्याने आजही विश्वासार्हता टीकून आहे. मात्र याच टपाल कार्यालयाकडून धक्कादायक प्रकार झाल्याचे धडगाव तालुक्यात समोर आला आहे.