चाकू हल्ला करत रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरच टाकलं, दोन्ही आरोपी फरार…
नांदेड: राज्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या,निर्घृणपणे होणारे खून ,धाकदपट , किरकोळ कारणांवरून मारहाण दररोज कानावर पडत असताना नांदेड शहर आज (26 फेब्रुवारी ) सकाळी युवकाच्या हत्येने हादरले.
नांदेड शहरातील गणेश नगर भागात आज सकाळी दोघांनी एका तरुणावर चाकू हल्ला करत रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरच टाकून दिलं .सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान हा हल्ला झाला .रस्त्याच्या मधोमध रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून स्थानिकांचे धाबे दणाणले आहे .अमोल भुजबळ असे मृत्य युवकाचे नाव आहे . गणेशनगर भागातील वाय कॉर्नरवर झालेल्या या हत्याकांडाने परिसरात मोठी दहशत पसरलीय.
या घटनेने संपूर्ण नांदेड शहर हादरले आहे .शहरात दिवसाढवळ्या रस्त्याच्या मधोमध दोन तरुणांनी केलेल्या चाकू हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला .रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या तरुणाला पाहून परिसरातील स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली .यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिकेसह पोलीस अधिकारी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा सुरू आहे .पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवलाय .ही हत्या नेमकी कशामुळे झाली याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही .अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
नांदेड शहर हादरले, तरुणाची चाकूने भोसकून हत्या
नांदेड शहरातील गणेश नगर भागात आज (26 फेब्रुवारी )सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान दोन तरुणांनी एका तरुणावर चाकू हल्ला केला .या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला .गणेश नगर परिसरातील वाय कॉर्नरवर मृतदेह तसाच टाकून हल्लेखोर फरार झाले . या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .घटनेची माहिती समजतात पोलीस आणि रुग्णवाहिका परिसरात दाखल झाली .घटनास्थळी या हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे .पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेतले असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचे सांगितले .घटनेचा पुढील तपास नांदेड शहर पोलीस करत आहेत .हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे .
