
दैनिक चालु वार्ता पाटोदा प्रतिनीधी: सुनिल तांदळे
पाटोदा (बीड) : पाटोदा तालुक्यातील सावरगांव घाट येथील शेतकरी श्रीमती सुरेखा जगन्नाथ सप्रे यांच्या शेतातील विहीरीमध्ये राञीच्यावेळी लांडगा पडल्याची माहीती वनपरिक्षेञ अधिकारी श्री. एस. एस. काळे यांना मिळाली. सदर लांडग्याला सुखरुप बाहेर काढण्यासाठी वनपरिक्षेञ अधिकारी श्री. एस. एस. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा वनपरिक्षेञातील कार्यरत असलेल्या वन कर्मचार्यांची रेस्क्यु टीम घटनास्थळी दाखल होवुन कौतुकास्पद कामगीरी करत विहीरीत पडलेल्या लांडग्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. सदरची कामगीरी ही वनपरिक्षेञ अधिकारी श्री. एस. एस. काळे यांच्या आदेशाने व वनपाल पाटोदा श्री. अजय देवगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. एस. आर. राठोड वनरक्षक अंमळनेर यांच्यासह वनमजुर सोपान येवले, ए. ए. सातपुते, शेख बशीर, सतिश गर्जे, पोपट पवार, शहादेव पवार, व जालींदर मिसाळ यांनी यशस्वी रित्या पार पाडली.