दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूगाव :
मा.पुणे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशा नुसार देहूनगर पंचायत कार्यलयात दोन रिक्त नगरसेवक पदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली.या पदासाठी योगेश मोरे आणि अमित टिळेकर असे दोन अर्ज प्राप्त झाले.नामनिर्देशित अर्ज प्राप्त झाल्या नंतर अर्ज छाननीची प्रक्रिया झाली असता त्यात योगेश मोरे यांचा अर्ज अवैध ठरला तर अमित टिळेकर यांचा एकमेव अर्ज वैध ठरल्याने ,निवडणूक पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी हवेली यांनी अमित श्रीपती टिळेकर यांची स्वीकृतनगरसेवक पदी निवड झाली असल्याचे जाहीर केले.
देहूनगर पंचायतीचे स्वीकृत नगरसेवक सचिन साळुंके आणि प्रदीप परंडवाल यांनी आपल्या पदाचा समक्ष राजीनामा दिला होता.त्यामुळे ही दोन पदे रिक्त होती.देहूनगर पंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी सदर रिक्त पदे नियुक्ती बाबत ३ मार्च रोजी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती.त्यानुस्वार जिल्हाधिकारी यांनी २५ मार्च २०२५ रोजी सभा घेऊन या दोन रिक्त पदांची नियुक्ती करावी असे निर्देश दिले ,आणि पीठासीन अधिकारी म्हणून उप विभागीय अधिकारी हवेली यांची नियुक्ती केली होती.
मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुस्वार २५ मार्च रोजी दोन स्वीकृत नगरसेवक रिक्त पदासाठी खालील प्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पडली.
नगरपंचायतीच्या नामनिर्देशित सदस्य पदासाठी सकाळी १० ते १२ या वेळेत अर्ज स्वकीरण्यात आले असता देहूनगर पंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्याकडे २ अर्ज प्राप्त झाले. दुपारी १ वाजल्या पासून पीठासीन अधिकारी यांनी नामनिर्देशित सदस्य पदाचे नामनिर्देशन पत्राची छाननी केली.या छाननित योगेश मोरे हे सर्वजनिक न्यासाच्या कार्यात पाच वर्षांचा काल पूर्ण करू न शकल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला ,तर अमित टिळेकर यांचा अर्ज वैध ठरल्याने , पीठासीन अधिकारी यांनी अमित टिळेकर यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली असल्याचे जाहीर केले. हवेली उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.
या निवडणूक प्रक्रिया प्रसंगी देहूनगर पंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे ,नगराध्यक्षा पूजा दिवटे ,उपनगराध्यक्ष , मयूर शिवशरण , गट नेते योगेश परंडवाल , नगरसेवक योगेश काळोखे , प्रवीण काळोखे आदींसह इतर नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते . नगरसेविका पूजा काळोखे , स्मिता चव्हाण ,शीतल हगवणे या नगरसेविका अनुपस्थित होत्या. ही निवडणूक प्रक्रिया होत असताना या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
