
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- काही प्रकरणे सुरवातीला लहान स्वरूपात असतात परंतू त्याचेच रुपांतर गंभीर गुन्ह्यांत होते .त्याकडे दुर्लक्ष न कर्ता स्थानिक पातळीवरील प्रकरण चिगळण्या पुर्वीच पोलीसांना कळवावे ,जेणेकरून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही.असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दि.२२ मार्च रोजी कंधार उस्माननगर पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षण आढावा बैठक व महाराष्ट्र शासनाच्या व १०० दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक नांदेड ,अबिनाश कुमार, डी.वाय.एस.पी पोपळघाट , कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार हे उपस्थित होते. पुढे बोलताना उमाप म्हणाले की, समाजातील जेष्ठ मंडळीनी तरूनांचे प्रबोधन करावे ,गुन्हे दाखल होण्यापासून रोखावे ,गुन्हे दाखल झाल्यावर तरूणांचे करिअरच्या अडचणी निर्माण होतात. त्यांचे भविष्य अंधारात जाते .नौकरी लागण्यासाठी किंवा साध लायसन्स काढायचे आसेलतर पोलीस स्टेशनचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पाहीजे जर त्याच्यावर एखादा गुन्हा आसेलतर चारित्र्य प्रमाणपत्र मिळत नाही त्यामुळे नौकरी पासून दुर रहावे लागते त्यासाठी तरूनांनी गुन्ह्यां पासून दुर रहावे असे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.
उस्माननगर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले व यावेळी विविध कार्यक्रमाला संबोधित केले.
पोलीस विभागातर्फे दरवर्षी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून वार्षिक तपासणी करण्यात येते यावर्षी नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप
यांनी २२ मार्च शुक्रवारी उस्माननगर ता.कंधार येथील पोलीस ठाण्याची तपासणी करून केलेल्या कामाचे यावेळी त्यांनी कौतुक केले आहे. उस्माननगर पो.स्टे. अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील, सरपंच , माजी सरपंच, लोकप्रतिनिधी यांच्या सोबत संवाद साधताना गावातील समस्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पोलीस मैदानात फळांचे व इतर जातींच्या वृक्षांची वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस ठाणे उस्माननगर सुशोभीकरणिचे व
आमराई चे कोनशिलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहाजी उमाप यांनी नागरिकांशी संवाद साधून परिसरातील समस्या जाणून घेतल्या यामध्ये पोलीस पाटील यांनी परिसरात होणारी अवैध मार्गाने होणारी दारू विक्री याकडे लक्ष द्यावे अशी विनंती केली.
तसेच उस्माननगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माची विनापरवानगी झेंडे व विशिष्ट जाती धर्माचा उल्लेख असलेले बोर्ड लावण्यात येत आहेत त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असा संवाद भाजपाचे तुकाराम वारकड गुरुजी यांनी केला. कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख असलेले बोर्ड परिसरात लागू नये आपल्या परिसरात महापुरुषांचे नावे द्यावी असा शासन निर्णय आहे परंतु संबंधितांकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते.
उस्माननगर व शिराढोण येथील लोकसंख्येने मोठे गावे आहेत या दोन्ही ठिकाणी महाविद्यालय आहेत याठीकाणी अधिकारी यांच्याकडून कायद्या विषयी मार्गदर्शन करावे असे प्रा.विजय भिसे सुसंवाद साधतांना म्हणाले.
या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी रोपटे देऊन मान्यवराची स्वागत केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता स्वच्छता,स्वच्छता संदेशाची लावलेली बॅनर उपस्थितांचे त लक्ष वेधून घेत होती. पोलीस ग्राउंड मध्ये लावलेल्या आमराई व कोणशीलेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाला उसाननानगर तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव पाटील लाठकर ,लोहा पंचायत समितीचे माजी सभापती सतीश पाटील उमरेकर, माजी सरपंच तुकाराम वारकड गुरूजी ,शिराढोणचे सरपंच खुशाल पाटील पांडागळे, उस्माननगर सरपंच प्रतिनीधी माणिक उर्फ पप्पू पाटील काळम,
उस्माननगर पोलीस पाटील विश्वभंर मोरे,
शिराढोण येथील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ पाटील कपाळे, संचालक देवराव सोनसळे ,प्रा.विजय भिसे ,संजय वारकड , शे.का.प .जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर,
दत्ता घोरबांड, मारोती घोरबांड, गंगाधर भिसे ,गंगाधर कांबळे , डि.के.कांबळे व परिसरातील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष महिला सरपंच,महिला पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मन्यवरांचा पोलीस पाटील,सरपंच, तंटामुक्तचे अध्यक्ष , गृहरक्षक दलातील जवान, सामाजिक ,शैक्षणिक ,पोलीस दलातील कर्मचारी ,पत्रकार यांच्याकडून मान्यवराचे यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सूत्रसंचालन पत्रकार सुर्यकांत मालीपाटील यांनी केले तर प्रस्ताविक व आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी केले.