
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : मुस्लिम समाजामध्ये पवित्र मानली जाणारी रमजान ईद शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा येथे उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. महिनाभर कडक उपवास ठेवत रोजा पाळल्यानंतर ३१ मार्च रोजी मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी आनंदाने एकमेकांची गळाभेट घेतली. आणि शुभेच्छा देवाणघेवाण केली. मशिदींमध्ये विशेष नमाज पठण करण्यात आले, त्यानंतर मुस्लिम बांधवांनी आप्तेष्ट आणि मित्रपरिवारासोबत ईदच्या आनंदात सहभागी होत सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण केले. यावेळी पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष श्री प्रकाश करपे, श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटोळे शिवव्याख्याते आकाश वडघुले, शिक्रापूर पो स्टे. चे भालेराव साहेब, पाटील साहेब यांनी मुस्लिम बांधवाना ईदनिमित्त शुभेच्छा देत एकतेचा संदेश दिला. या वेळी मौलाना गुलजार अंसारी,अब्दुल रहमान मोमीन , जावेद शेख, शाहरुख मुलाणी ,अशपाक मुलाणी, जमाल मुलाणी ,अहमद शेख, अमीर शेख ,अमजद मुलाणी ,अकबर मुलाणी ,शफीक खान, हरून शेख , सिराज मुलाणी ,फयाज मुलाणी ,रफिक मुलाणी, नूर पठाण, इस्माईल मुलाणी यांनी एकत्र येत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.सर्वत्र चैतन्यपूर्ण वातावरण होते, आणि रमजान ईदने टाकळी भिमात सद्भावनेचा संदेश दिला.