
xr:d:DAFLKAhL6LQ:1169,j:611701122,t:22121809
12 नगरसेवक गळाला…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. 12 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या 9 विद्यमान नगरसेवकांसह महाविकास आघाडीच्या 12 नगरसेवकांचा यात सहभाग आहे.
कुही नगरपंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाचे विद्यमान नगरसेवक भाजपात प्रवेश केला आहे.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ग्रामीण काँग्रेसचा पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूरच्या दौरा नुकताच झाला. त्यानंतर नागपूर भाजप कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यामध्ये नवचैतन्य संचारले आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वीच नागपुरातील वातावरण ढळवून निघाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मोदींचा हा पहिला नागपूर दौरा होता. या दौऱ्यामुळे नागपूर शहर हे भाजपमय झालेलं बघायला मिळालं.