
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड देगलूर
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्ज माफी, व बहीणीना2100 रुपये मदत देण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी याबाबत अधिक माहिती अशी की ,नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीने निवडणुकीनंतर सत्तेवर आल्यास शेतकरी बांधवांचे संपूर्ण कर्ज माफ करुन सातबारा कोरा करण्याचे व लाडकी बहिण योजनेअंतर्गत महीलांना 1500 वरुन 2100 रुपये मदत प्रती महीना देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात व सभेत बोलताना दिल्या मुळे भोळ्याभाबड्या शेतकरी बांधवांनी व लाडक्या बहिणी महायुतीवर विश्वास दाखवित भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना भरभरून मतदान केले सत्तेवर बसल्यावर मात्र दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवली आहे उलट कर्ज माफी होणार नसल्याचे स्पष्ट करीत शेतकऱ्यांनी बॅकेत कर्ज भरण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्याची व लाडक्या बहिणीची फसवणूक सरकारने केली आहे ना पिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी बांधव दररोज आत्महत्या सारखा अघोरी कृत्य करीत असताना शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांच्या आत्महत्येत वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्याकरिता सरकारने निवडणुकी पुर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्वरित शेतकरी बांधवांची कर्ज माफी करुन लाडक्या बहिणीला 2100 रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे तहसीलदार भरतसुर्यवंशी यांच्या कडे सुपुर्द करण्यात आले जनतेला एप्रिल फुल बनविणाऱ्या महायुतीच्या जाहीर नाम्याची जाहीर होळी आज दिनांक 1 एप्रिल रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आली यावेळी निदर्शने व प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते