
धुळे: महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या तीन दिवसीय धुळे नंदुरबार दौऱ्यात सापडलेल्या रकमेने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अंदाज समितीचे अध्यक्ष असलेले अर्जुन खोतकर यांचे शासकीय स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या धुळे शहरातील विश्रामगृह रूम नंबर 102 मध्ये 1 कोटी 84 लाख 84 हजार रुपये मिळून आले आणि यानंतर ही अंदाज समिती चांगली चर्चेत आली.
यावरुनच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी गंभीर आरोप केले आहेत.
धुळ्यात सापडलेल्या पैसे प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे.अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. दमानिया आज जालना दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यादरम्यान त्यांनी ही मागणी केली आहे.धुळ्यात 1कोटी 84 लाख खोतकरांच्या स्विय्य सहाय्यकांच्या खोलीत सापडले पण त्याआधी ते साडेतीन कोटी घेऊन पळाले असल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केला आहे.
धुळ्यातील प्रकरणात खोतकर दोषी असल्याचं सरकारलाही माहीत आहे असा टोलाही दमानिया यांनी हाणला आहे.दोषी नव्हते तर मग खोतकरांच्या सहाय्यकाला निष्कसीत कसं काय केलं.? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.मी सगळ्यांविरोधात लढणार आहे अस सांगत जालन्यातील 417 नंबरच्या सर्व्हेमध्ये खोतकरांच्या जवळच्या लोकांनी अतिक्रमण केलं असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना हे अतिक्रमण काढण्यासाठी पत्र दिलं असून अतिक्रमण तातडीने काढण्याची मागणी अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.