
भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये धक्कादायक निष्कर्ष; 150 जागा…
स्थानिक स्वराज संस्था निवडणूक चार महिन्यात घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले होते. त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूक होणार हे निश्चित मानले जात आहे.
उद्धव ठाकरे या निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करण्यासाठी ते सकारात्मक आहेत. मनसेने देखील या युतीसाठी प्रतिसाद दिलाय. त्यामुळे भाजपला ही निवडणूक अवघड जाईल, असे मानले जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी भाजपने अंतर्गत सर्व्हे केला होता. या सर्व्हेचे निष्कर्ष आता पुढे आले आहेत.
सर्व्हेनुसार भाजपने 227 जागा असलेल्या मुंबई महापालिकेमध्ये 150 पेक्षा अधिक जागा लढणे फायद्याचे आहे. त्यामुळे मोठे यश मिळू शकते. त्यामुळे युतीमध्ये लढत असताना मित्रपक्षांना कमी जागांवर समाधान मानावे लागू शकते. विशेषता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आपल्याकडे 40 माजी नगरसेवक आहेत तसेच निवडणुकीआधी आणखी इन्कमिंग होणार आहे. त्यामुळे 100 जागांवर ते दावा सांगण्याची शक्यता आहे.
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले तर काय होईल, याचा अंदाज देखील सर्व्हेमध्ये घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपला धक्का बसेल असे मानले जात असताना सर्व्हेतील अंदाज नेमका उलटा आहे. राज आणि उद्धव यांच्या युतीचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नाही. भाजप 150 पेक्षा अधिक जागा लढून ठाकरे बंधुवर सहज मात करतील, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या विषयी एका मराठी वृत्तवाहिनीने देखील वृत्त दिले आहे.
शिंदे छोट्या भावाच्या भूमिकेत?
विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. मात्र तरीदेखील महायुतीमध्ये त्यांना कमी जागा लढाव्या लागल्या. भाजपने सर्वाधिक जागा लढल्या. आता मुंबई महापालिकेत देखील शिंदेंना छोट्या भावाच्या भूमिकेत जावे लागणार आहे. भाजपने 150 पेक्षा अधिक जागा लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदेंच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे. मात्र, ठाणे महापालिकेत शिंदेंसाठी जास्त जागा सोडून भाजप तेथे छोट्या भावाची भूमिका निभावणार आहे.
मनसे उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या तयारीत
राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांबाबत मनसेकडून सावध पावले उचलण्यात येत होती. मनसेतील कोणताही नेता यावर स्पष्ट बोलत नव्हता. मात्र, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत मनसे पावले पुढे टाकत असल्याचे संकेत दिले आहे. 2017 च्या युतीच्या फसलेल्या निर्णयानंतर मनसेकडून सावध पावले उचलली आहेत. मात्र, युतीसाठी ते सकारात्मक असल्याचे वृत्त ‘साम टिव्ही’ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.