
ठाणे- दिवा शहर म्हणजे अनधिकृत शाळेंचे माहेरघर झाले आहे. ठाणे महानगरपालिकेतील ९०% अनधिकृत शाळा ह्या एकट्या दिवा शहरात आहेत. अनाधिकृत शाळेंचा विषय दिवा शहरात गाजत असताना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील यांनी लेखी पत्राद्वारे दिवा शहरातील अनधिकृत शाळांना विनंती केली आहे की आपण येणाऱ्या शैक्षणिक वर्षात ऍडमिशन घेऊ नये आणि घेतले असतीलच तर त्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे अशी विनंती चे पत्र शहरातील सर्व अनधिकृत शाळांना देऊन गांधींगिरी पद्धतीने ह्या शाळांना समज दिली आहे.
शहरप्रमुख सचिन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की दिवा शहरातील स्मार्ट एज्युकेशन स्कूल मध्ये घडलेला दुर्दैवी प्रकार हा अनधिकृत शाळांवर प्रशासनाचा नसलेल्या नियंत्रणाचे परिणाम असून, पुन्हा असे प्रकार घडू नये आणि विद्यार्थांचे होणारे भाविष्याचे शैक्षणिक नुकसान ह्यामुळे अनधिकृत शाळा विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर ठाम उभी आहे. आता आम्ही गांधीगिरी पद्धतीने पत्र देऊन विनंती केली आहे जर अनाधिकृत शाळा सुरूच राहिल्या तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर च्या वतीने आम्ही अनधिकृत शाळा विरोधात माननीय न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.