
दहशतवादी करु शकणार नाही पीर पंजालमधून घुसखोरी !
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते 46 हजार कोटी रुपयांच्या योजनांची सुरुवात करणार आहेत. तसेच जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब ब्रिज आणि भारताचा पहिला केबल-स्टे रेल ब्रिज अंजी ब्रिजचे लोकार्पण करणार आहे.
तसेच उधमपूर-श्रीनगर-बारामूल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) परियोजना आणि जम्मू-श्रीनगर रेल्वे लाइनचे उद्घाटन करणार आहेत. भारताच्या या योजनांमुळे पाकिस्तान आणि चीन टेन्शनमध्ये आले आहेत. हे संपूर्ण प्रकरण हिमालयातील पीर पंजाल पर्वतरांगाभोवती केंद्रित आहे, ज्याला मोदींचे चिनाब चक्रव्यूह म्हटले जात आहे.
पीर पंजाल दर्रा हिमालयाचा विस्तार आहे. हा भाग काश्मीर खोऱ्यास मुगल रोडच्या माध्यमातून राजौरी आणि पुंछ भागाला जोडतो. 3,490 मीटरवर मुगल रोडचा सर्वात उंच पाईंट आहे. काश्मीर खोऱ्याच्या दक्षिण-पश्चिम भागात हा भाग आहे. पीर पंजाल दर्राच्या सर्वात जवळचे शहर शोपिया आहे. त्या ठिकाणी पहलगाम हल्ला झाला होता. याला लागून असलेली बैसरन खोऱ्यातील जंगलसुद्धा पीर पंजालला जोडले गेले आहे.
आयएसआयचे नेटवर्क तुटणार
चिनार ब्रिजमुळे पीर पंजाल क्षेत्रात पाकिस्तानच्या लश्कर, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांबरोबर आयएसआयचे नेटवर्कही तुटणार आहे. या पीर पंजाल भागातून दहशतवादी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करतात. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी या भागातील जंगलांमध्ये फरार झाले होते. आता हे शक्य होणार नाही. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर टेन्शनमध्ये आले आहे. पाकिस्तानबरोबर चीनसाठी भारताचा हा पूल टेन्शन असणार आहे.
चिनाब पूल भारताच्या तंत्रज्ञान क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हा पूल निर्माण करण्यासाठी IIT आणि DRDO ची मदत झाली. या पुलामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये रेल्वेची कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. या भागाचा आर्थिक विकास होणार आहे. तसेच सामाजिक विकासाबरोबर पर्यटनासही चालना मिळणार आहे. चिनाब पुलामुळे कोणत्याही ऋतूत भारतीय सैन्य एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकणार आहे. जम्मू-काश्मीरबरोबर लडाखमध्ये सैन्य तैनातीसाठी मदत होणार आहे.
चिनार ब्रिजमुळे दहशतवादाला आळा घालण्यासाठी काउंटर टेरर प्लॅनिंग करणे सोपे होईल. हिमालयातील पीर पंजाल रांगेत घुसखोरीला आळा घालता येणार आहे. खोऱ्यात प्रवेश करणाऱ्या दहशतवाद्यांवर आणि दहशतवादी घटनांवर पायबंद घालता येणार आहे. आपणास जलदगतीने सैन्य पाठवता येणार आहे.