
विमान अपघातात कुटुंबाचा करुण अंत !
अहमदाबादेत काल एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले. या विमानातील सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. यातील एका कुटुंबाची कहाणी अत्यंत हृदयद्रावक अशीच आहे.
एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी अख्खं कुटुंबच लंडनला निघालं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. या अपघातात राजस्थानातील एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील पाच जण बांसवाडा येथील जोशी परिवारातील होते.
प्रतिक जोशी मागील सहा वर्षांपासून लंडनमध्ये एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करत होते. त्यांचं एकच स्वप्न होतं आपली मुलं आणि पत्नीलाही लंडनला घेऊन येथेच सेटल होण्याचं. त्यांचं स्वप्न लवकरच सत्यात उतरणार होतं. पण दुर्दैवाने विमान अपघातात या त्यांचा मृत्यू झाला. प्रतिक जोशी यांची पत्नी डॉ. कोमी व्यास देखील मयत झाल्या आहेत. कोमी या एक मेडिकल प्रोफेशनल होत्या. लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वीच नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यांच्याबरोबर त्यांची तीन मुलं देखील होती. परंतु, लंडनला जाणं दूरच त्याआधीच मृत्यूने त्यांना गाठलं. या घटनेची माहिती मिळताच पूर्ण बांसवाडात शोककळा पसरली.
मृतांच्या कुटुंबियांना एक कोटींची मदत
गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले असून या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा असोसिएडेट प्रेस या संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुपकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. ड्रीमलाइनर विमानने टेकऑफ केल्यानंतर लगेच कोसळला. याच विमानामध्ये कृ मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाचे सून असून या देखील याच विमानात होत्या.
घटनास्थळी सध्या बचाव कार्य सुरु आहे. घटनास्थळी लष्कराचे 130 जवान बचावकार्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे या अपघातामध्ये सर्व 242 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 51 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.