
CM देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता काँग्रेसचा हल्लाबोल; म्हणाले…
मुख्यमंत्र्यांनी दोन दोन राजकीय पक्ष फोडले… त्यांना प्रभाग फोडायला वेळ लागणार नाही, असे खळबळजनक आरोप काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाव न घेता केले आहे.
ते (CM) फोडाफोडीचे एक्सपर्ट असून वेशांतर करून त्यांनी पक्ष फोडले, मग प्रभाग फोडणे त्यांच्यासाठी खूप सोपे खेळ आहे” असे मत काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी व्यक्त केले आहे. “सत्ताधारी आपल्या राजकीय अनुकूलतेसाठी दलित आणि अल्पसंख्यांक वस्त्यांना नियमांच्या विरोधात जाऊन फोडतील, अशी शंका ही गुडघे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
प्रभाग रचना प्रशासनाच्या हाती सोपविणे म्हणजे…
महापालिका निवडणुकांसाठी प्रशासनाने प्रभागांची रचना करावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहे. मात्र ही प्रक्रिया निष्पक्ष होणार नाही, सत्ताधारी खासकरून भाजप त्यात हस्तक्षेप करेल, अशी शंका काँग्रेसने व्यक्ती केली आहे. मनपामध्ये प्रशासक राज असून ते एकप्रकारे सत्ताधाऱ्यांचा राज आहे. असे असताना प्रभाग रचना प्रशासनाच्या हाती सोपविणे म्हणजे सत्ताधाऱ्यांनी स्वतःच स्वतःला प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिल्यासारखे होईल, असे काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडघे पाटील म्हणाले.
महापालिकांमध्ये बसलेले प्रशासक, अधिकारी सत्ताधाऱ्यांचे गुलामच- गुडघे पाटील
सत्ताधारी आणि मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप प्रभाग रचनेसह निवडणुकीच्या प्रत्येक बाबतीत राहील. सत्ताधारी प्रशासनाच्या माध्यमातून अशी प्रभाग रचना करून घेतील जी नागरिकांच्या सोयीची नसेल, तर राजकीय सोयीप्रमाणे केली जाईल. कारण यांच्यासाठी नागरिक दुय्यम असून सत्ताच प्रमुख आहे. सत्ता राखण्यासाठी हे सर्व चांगले वाईट प्रयत्न करतील, असे ही गुडघे पाटील म्हणाले. दलीत वस्त्यांना, अल्पसंख्यांक वस्त्यांना विभागु नये, असे दिशानिर्देश असताना अशा वस्त्यांना फोडले जाईल आणि सोयीचे प्रभाग निर्माण केले जाईल, अशी आमची शंका असून त्यासंदर्भात आमच्या आक्षेप हरकतींवर सुनावणी ही होणार नाही. असे गुडघे पाटील म्हणाले.. महापालिकांमध्ये बसलेले प्रशासक, अधिकारी सत्ताधाऱ्यांचे गुलामच असल्याचा आरोप ही त्यांनी केला.
नागपूरमध्ये 151 जागेवर निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण, काँग्रेस स्वबळावर लढणार?
दुसरीकडे, भाजप पाठोपाठ काँग्रेसचासुर देखील नागपूर महानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याकडे दिसत आहे. नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहे. नागपूरमध्ये आमची 151 जागेवर निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही स्वबळावर निवडणूक लढायला सज्ज आहे. आमच्या प्रभाग समित्या यासाठी कामाला लागल्या आहे. मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेईल, अशी भूमिका घेत विकास ठाकरे यांनी चेंडू पक्षश्रेष्ठीच्या कोर्टात टाकला. भाजप व राष्ट्रवादी यांनी जागा वाटपावरून तू-तू, मै-मै सुरू असतांना काँग्रेसच्या या स्वबळाच्या भूमिकेने ठाकरे गट आणि शरद पवार गटाला धक्का बसला आहे.