
अजित पवारांनी पुन्हा काढला वयाचा मुद्दा…
येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंगलं जाणार आहे. राजकीय पक्षांकडून याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पुन्हा एकदा वयाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा वयाचा मुद्दा काढला आहे. मी चांगलं काम करू शकेल की 85 वर्षाचा माणूस चांगलं काम करू शकेल, असं म्हणत अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विरोधक चंद्रहार तावरे यांना टोला लागवला आहे.
अजित पवारला पैशांची गरज नाही, बाप जाद्याच्या कृपेने बर चाललं आहे. मी सत्तेला हापापलेलो नाही. मी चांगलं काम करेल का 85 वर्षांचा माणूस चांगलं काम करेल? असे म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा वयाचा मुद्दा उपस्थित केला आहे. कारखाना निवडणुकीतील विरोधक असलेल्या 85 वर्षे वयाच्या चंद्रराव तावरे यांना अजित पवारांनी टोला लगावल्याचं सांगितलं जात आहे.
यापूर्वीही अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांविरोधात हाच मुद्दा उपस्थित केला होता. आता पुन्हा एकदा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून वयाचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे.