
लोहा व कंधार / दिनांक 9 जून रोजी कंधार येथे जिल्हास्तरीय संवाद कार्यशाळा या कार्यशाळेत लोहा व कंधार तालुक्यातील शंभर महिला उपस्थित होत्या ही कार्यशाळा म्हणजे ग्रामीण भागातील महिला व शासन यांच्यामधील संवाद स्वयं शिक्षण प्रयोग ही संस्था सन 1993 पासून स्वच्छता आरोग्य पाणी क्लीनऊर्जा सेंद्रिय शेती महिलांचा नेतृत्व विकास व्यवसाय इत्यादी विषयावर काम करते नांदेड मधील लोहा व कंधार तालुक्यातील शंभर गावासोबत काम करते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कंधार तहसिलदार रामेश्वर गोरे सर व गटविकास अधिकारी महेश पाटील सर कृषी अधिकारी गणेश कोकाटे व बेगम मॅडम हे उपस्थित होते
महेश पाटील सरांनी वृक्षारोपण व घरकुला संबंधी योजनेबद्दल माहिती दिली घरकुलाचे पैसे वेळेवर का पडत नाही त्यासाठी मोबाईल नंबर आधार नंबर लिंक असला पाहिजे त्यासाठी केवायसी करणे व वाळू मिळण्यासाठी अर्ज कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली त्याचबरोबर पावसाळ्यात होणाऱ्या विविध जातीच्या आजारापासून आणि कसे सुरक्षित ठेवले पाहिजे पाणी नमुना कसा तपासला पाहिजे इत्यादी विषयावर माहिती दिली.
तहसीलदार गोरे सर यांनी शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी मार्गदर्शन केले त्यामध्ये शेतकऱ्याचा फार्मर आयडी असणे किती गरजेचे आहे विमा अनुदान पडण्यासाठी तहसील मध्ये केवायसी करणे आधार मोबाईल खात्याला लिंक करणे आणि त्यानंतर तिथे एक ओटीपी येतो तो ओटीपी सांगणे यामुळे शेतकऱ्यांचा कसा फायदा होतो आणि हे जर शेतकऱ्यांनी केलेला नाही तर कसे नुकसान होते व शेतीमधील विविध योजना याबद्दल माहिती सांगितली.
कृषी विभागाचे गणेश कोकाटे सर यांनी शेती संबंधी विविध योजना सांगितल्या जसे की फळबाग लागवड व कृषी विभागाच्या विविध योजना याबद्दल माहिती सांगितली. त्याचबरोबर मिळालेल्या सी आय आय फाऊंडेशन दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील भारतातुन 20 महीलांना पुरस्कार देण्यात आला त्यात कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील रेवती कानगुले व लोहा तालुक्यातील बामणी येथील पायल कोकाटे यांचा सत्कार ही तहसीलदार सर व गटविकास अधिकारी सर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्थेबद्दल माहिती संस्थेचे राजाभाऊ जाधव यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा आहेर यांनी केले. कार्यक्रमासाठी मार्गदर्शन विजयमाला शेंडगे व देवकन्या जगदाळे मॅडम यांनी केले कार्यक्रमासाठी उपस्थित लीडर सविता नाईकवाडे सुनिता जकापुरे ज्योती अमलापुरे सविता करणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.