
म्हणाले; सूचना दिल्या होत्या पण…
विधानसभा निवडणुकीपूर्वी इंद्रायणी पुलाची दुरुस्थी करण्याच्या सूचना मी दिल्या होत्या. त्यामध्ये का? आणि कुणी दिरंगाई केली हे तपासून कारवाई करण्यात येईल.
तसंच, याबाबत मी शिवेंद्रराजे भोसलेयांच्याशीही बोललो आहे अशी माहिती भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळून नुकतीच मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले. तर समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे २५ जण वाहून गेले. या घटनेनंतर या पुलाच्या दुरुस्थीचा मुद्दा समोर आला होता. त्यावर बोलताना रंविद्र चव्हाण यांनी आज भाष्य केलं आहे.