
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :उदगीर शहरात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या पुढाकारातून नगरोत्थान योजना व दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत विविध कामांना वेग मिळत असून, त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक ०४ मधील पंचशील नगर (देगलूर रोड) व प्रभाग क्रमांक १५ मधील रमेश अंबरखाने यांच्या घरासमोरील परिसरात काँक्रीट नालीच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या शुभारंभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष फैजुखा पठाण, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, राजकुमार भालेराव, शेख फैय्याज, पाशा मिर्झा, नरसिंग शिंदे, व्यंकट बोईनवाड, राजकुमार चव्हाण, इब्राहिम पटेल नाना, सनाउल्ला खान, प्रदीप जोंधळे, शफी हाशमी, मधुमती कनशेट्टे, वैशाली कांबळे, हुस्ना बानो, राहुल सोनवणे, आजम पटेल, इस्माईल मौलाना, शेख अमजद मौलाना, अविनाश गायकवाड, गौतम कांबळे, सतीश कांबळे, राजकुमार गंडारे, बापू साळुंके, हाशमी हिफ्जुरहेमान, राम सोनवणे, प्रदीप गवळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना प्रमुख मान्यवरांनी माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उदगीर शहरातील प्रलंबित विकासकामांना गती मिळत असल्याचे सांगून, आगामी काळातही नागरिकांच्या गरजांनुसार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
नगरोत्थान योजना, दलित वस्ती सुधार योजना आणि इतर शासकीय निधीच्या माध्यमातून शहरात पाणी, गटार, रस्ते आणि प्रकाश व्यवस्था यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नालीच्या कामामुळे परिसरातील पाणी साचण्याची समस्या सुटणार असून, आरोग्यदृष्ट्या स्वच्छतेची परिस्थिती निर्माण होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे नियोजन उत्साहात पार पडले असून, नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.