
कुठे व कधी मुक्काम ?
देहूगाव (जि. पुणे) श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली.
ते म्हणाले की, यंदाचा ३४० वा पालखी सोहळा आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने पूर्ण तयारी झाली आहे. चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला आहे.
त्याला आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मंदिरात ४२ व मंदिराच्या बाहेरील भागात आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मंदिराच्या कळसाला फुलांची सजावट करण्यात आली आहे.
भजनी मंडपात सकाळी प्रस्थानापूर्वी देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी अडीचला महाराजांच्या पादुकांचे पूजन होऊन पालखीचे प्रस्थान ठेवले जाणार आहे.
कसा आहे? संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग
यंदा संस्थानने तीन बैलजोड्या खरेदी केल्या आहेत. पालखीपुढे चालणारा मानाचा पेठ बाभुळगावकरांचा अश्व मंगळवारी चिखली येथे मुक्कामी असणार असून, बुधवारी प्रस्थानस्थळी उपस्थित होईल. अकलूजच्या मोहिते-पाटील यांचा अश्व बुधवारी सकाळी देहू येथे दाखल होईल.
कुठे कधी मुक्काम ?
१८ जून – देहूतून प्रस्थान
१९ जून – आकुर्डी
२० जून – नाना पेठ, पुणे
२१ जून – निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे
२२ जून – लोणी काळभोर
२३ जून – यवत
२४ जून – वरखंड
२५ जून – उंडवडी गवळ्याची
२६ जून- बारामती
२७ जून – सणसर
२८ जून – निमगाव केतकी
२९ जून – इंदापूर
३० जून – सराटी
१ जुलै – अकलूज
२ जुलै – बोरगाव श्रीपूर
३ जुलै – पिराची कुरोली
४ जुलै – वाखरी
५ जुलै – पंढरपूर
पालखी सोहळ्यात रंगणार तीन उभे, तीन गोल रिंगण
◼️ बेलवडी येथे पहिले गोल रिंगण.
◼️ काटेवाडी येथे मेंढ्यांचे रिंगण.
◼️ इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण.
◼️ सराटी येथे पादुकांना नीरास्नान.
◼️ अकलूज येथे तिसरे गोल रिंगण.
◼️ माळीनगर येथे पहिले उभे रिंगण.
◼️ तोंडले बोंडले येथे धावा.
◼️ बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण.
◼️ वाखरी येथे पादुका आरती आणि तिसरे उभे रिंगण.
◼️ यंदा तिथींचा क्षय झाल्याने आंथुर्णे येथील पालखीचा मुक्काम रद्द.
◼️ यंदा पालखी रथाच्या पुढे २७ व मागे ३७० दिंड्या सहभागी होणार.