
खासदार संजय राऊत यांची टीका !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकही सरळ चाल न टाकता फोडाफोडीचं राजकारण करतात. त्यांना सलीम कुत्ता, दाऊद इब्राहिम, छोटा राजन हे देशद्रोही आता चालतात. भाजप हा ‘देशद्रोही आणि ढोंगी पक्ष’ आहे.
त्यांनी सलीम कुत्त्याला संत म्हणून पदवी द्यावी अशी जळजळीत टीका खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे सुज्ञ असून ते महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य निर्णय घेतील असे देखील राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी आज (दि. 18) संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री हे राज्यातील कारस्थानी गृहस्थ आहेत. त्यांच्या मनात काय चालले असेल हे कुणाला कळत नाही.
त्यांचे फोडा, जोडा, राज्य करा असे धोरण आहे. मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, ते नेहमी राष्ट्रवादाची भाषा बोलतात. तुम्ही आरएसएसचे लोक आहात ना? यावर मोहन भागवत यांनी भाष्य केलं पाहिजे. तुमच्याकडे तिरंगा का नसतो हे आत्ता कळलं आहे. भाजपसारखा देशद्रोही पक्ष हा देशाच्या इतिहासात झाला नाही.