
आसिम मुनीरने उडवली शाहबाज शरीफ यांची खिल्ली !
पाकिस्तानात लोकशाही असती तरी सरकार अप्रत्यक्षपणे सैन्याद्वारे चालवले जाते. कारण अनेकदा सैन्यातने देशाची सत्ता हातात घेतल्याचे समोर आलेले आहे. अशातच आताही पाकिस्तानातील स्थिती ठीक नसल्याचे समोर आले आहे.
फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेत केलेल्या एका विधानामुळे पाकिस्तानात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची इज्जत किती आहे याची कल्पना येते. कारण अमेरिकेत मुनीर यांनी शरीफ यांची खिल्ली उडवली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
असीम मुनीर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनिवासी पाकिस्तानी लोकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. मुनीर यांनी म्हटले की, ‘इस्लामाबादमध्ये कुत्रा पंतप्रधान बनला असला तरी तुम्ही अनिवासी पाकिस्तानी लोकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.’ या विधानामुळे पाकिस्तानातील शाहबाज शरीफ यांचे सध्याचे सरकार जगाला दाखवण्यासाठी फक्त एक मुखवटा आहे असे समोर आले आहे.
मुनीर यांच्या या विधानाची चर्चा पाकिस्तानसह जगभरात सुरु आहे. पाकिस्तानी सैन्य पडद्यामागून सरकार चालवत आहे. मुनीर देशाच्या पंतप्रधानांना कुत्र्यापेक्षा जास्त भाव देत नाहीत. जोपर्यंत कुत्रा सैन्याच्या आदेशानुसार काम करतो तोपर्यंत सर्व काही ठीक असते, मात्र कुत्रा थोडासा भुंकायला लागला की त्याची अवस्था पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासारखी होते.
डोनाल्ड ट्रम्प आणि मुनीर यांची भेट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच पाकिस्तानचे फील्ड मार्शल आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. बऱ्याचदा ट्रम्प यांना दुसऱ्या देशाशी चर्चा करायची असल्यास ते त्या देशाच्या अध्यक्षांशी किंवा पंतप्रधानांची भेट घेतात. मात्र यावेळी ट्रम्प यांनी असीम मुनीर यांना जेवणासाठी का आमंत्रित केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुनीर यांना भेटण्याचे कारण म्हणजे ट्रम्प यांना माहिती आहे की पाकिस्तानचा खरा बॉस शाहबाज शरीफ नसून मुनीर हे आहेत. ट्रम्प यांनी शाहबाज यांच्याशी कोणतीही चर्चा केली तरी अंतिम निर्णय मुनीरच घेणार हे ट्रम्प यांना माहिती आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी शरीफ यांना भेटण्याऐवजी थेट मुनीर यांची भेट घेतली. खास बाब विशेष म्हणजे मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार यांना देण्यात यावा अशी मागणीही केली आहे.