
दैनिक चालु वार्ता उमरी/प्रतिनिधी – श्रीनिवास मुक्कावार
मुखेड : तालुक्यातील जांब बु येथील प्रसिद्ध कापड व्यापारी विजय पांपटवार यांची आर्य वैश्य महासभेच्या बांधकाम समितीवर निवड झाली आहे त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तालुक्यातील जांब बु येथील विजय पांपटवार हे नेहमी सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक कामात पुढाकार असतो या कामाची दखल घेत महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेने दिनांक 18 जून रोजी आर्य वैश्य महासभेच्या बांधकाम समितीच्या सदस्य पदी त्यांची निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीने जाबं बु येथील समाज बांधवांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.