
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-एकनाथ गाडीवान
देगलूर. तालुक्यातील चालुक्यकालीन ऐतिहासिक नगरी येरगी येथे आयोजित महिलांचा आरोग्य शिबिरात २१५ महिला व किशोरवयीन मुलींची तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी ही आरोग्य हितकारक समाज व्यवस्था निर्माण करण्याचे संस्कार मुळातच असण्याची गरज ग्रामीण क्षेत्रात आजघडीस आवश्यक आहे. याच दिशा-निर्देशाचे पालन करणारी येरगी ग्रामपंचायत ही महाराष्ट्र नव्हे तर देशात आघाडीवर आहे. ग्राम स्वच्छता घंटागाडी,पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण यासारख्या आरोग्य सहाय्य करणाऱ्या घटकांना अग्रस्थानी ठेवून गावातील तरुण,वृध्द माता भगिनींच्या आरोग्य तपासणीसाठीये निःशुल्क शिबिराचे आयोजन येरगी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केले होते. आरोग्य केंद्र वर्ग
येरगीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील दि.२० व २२जून रोजी येरगी ग्रामपंचायतच्या वतीने १२ ते५५ वयोगटातील महिला व किशोरवयीन मुलींचे व महिलांचे ॲनिमिया रक्तालपता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातील एकूण ४२० पैकी २१५महिला व किशोरवयीन युवतीने गरोदर मातांनी या शिबिराचा लाभ घेतला असून उर्वरित महिलांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.ॲनिमिया रक्तालपत्ता शिबिरात एचडी तपासणी,बीपी, तपासणी शुगर तसेच सीबीसी तपासणी करण्यात आली.यामध्ये एकूण २१५स्त्रियांची व मुलींची तपासणी करण्यात आली.
त्यांना औषधोपचार करण्यात आला असून,अनियमितग्रस्त महिलांना प्रशिक्षण देऊन पोषण हे परसबागेच्या माध्यमातून अनिमियायुक्त करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न ग्रामपंचायत येरगी ता.देगलूर करणार आहे. या शिबिराप्रसंगी भा.ज.पा.जिल्हा उपाध्यक्ष सरपंच संतोष पाटील येरगीकर,ग्रामपंचायत सदस्य अशोक बरसमवार,विश्वनाथ बागेवार,अशोक वाघमारे शालेय शिक्षण समिती सदस्य रमेश घंटावर, मुख्याध्यापक अशोक देवकते,तंटामुक्तीचे सायलू कांबळे, येरगी आरोग्य उपकेंद्राचे डॉ. किरण ठाकरे, डॉ. कविता मोरे,आरोग्य केंद्रातील आरोग्य विस्ताराधिकारी अशोक विद्देवार,महादेव इज्जरवार आदी सहाय्यक सर्व कर्मचारी,सिस्टर,एकपीडब्ल्यूआशा,एएनएम,आशासेविका या सर्वांनी हे शिबिर यशस्वी होण्याकरता परिश्रम केले आहेत.