दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
__________________
ठाणे,दि.27(जिमाका) :- ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना याव्दारे अवगत करण्यात येते की, सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष / महिला व एकूण अशी सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, विषयांकित कायद्यातील तरतुदींनुसार विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.rojgar. mahaswayam.gov.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे.
त्यानुसार जून 2025 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर 1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयाव्दारे चालू असून या सर्व आस्थापनांकडून 100% प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यास्तव या सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच यूजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर करून प्रत्येकाने या विभागाच्या www. rojgar.mahasway am.gov.in या संकेतस्थाळावर लॉगिन करावे व आपली अचूक माहिती ऑनलाईन पद्धतीने सादर करावी. ही तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 ही आहे, याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी व हे तिमाही विवरणपत्र विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे, तसेच प्रत्येक आस्थापनेने आपापला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्यावत करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे सहायक आयुक्त संध्या स. साळुंखे यांनी केले आहे.
या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास, प्रत्यक्ष किंवा ई-मेल आयडी thanerojgar@gmail.com/asstdiremp.thane@ese.maharashtra.gov.in यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात यईल, असेही त्यांनी सूचित केले आहे.