
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी-एकनाथ गाडीवान.
देगलूर.तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगीचे सरपंच संतोष पाटील यांना निमंत्रित म्हणून सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे १६व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत विकासासाठी महत्त्वपूर्ण विषयावर बैठक पार पाडली. वित्त आयोगाच्या उपयोजन व विकास संदर्भात मार्गदर्शक सूचना मागवण्याचा समितीमध्ये देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन नगरीचे सरपंच संतोष पाटील यांना निमंत्रण करण्यात आले.होते प्रधान सचिव एकनाथ डवले १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ.अरविंद पनगडीया यांचे सर्वप्रथम स्वागत करण्यात आले.यावेळी विविध मागण्याचे निवेदन सुपूर्द करण्यात आले.याप्रसंगी १६व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने पूर्वतयारी संदर्भात बैठक घेण्यात आली.वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी आदर्श सरपंच पोपटराव पवार,आदर्श सरपंच दादासाहेब काळे,अमोल भुजबळ,देगलूर तालुक्यातील मौजे येरगीचे सरपंच संतोष पाटील येरगीकर,मनीष फुके,अर्चना सावंत,जयश्री इंगोले,सिंधु तायडे,तेजराम चव्हाण, श्रद्धा गायधने,डॉ.कविता वारे,सुधीर गोसमारे,प्रल्हाद वाघमारे,भाऊसाहेब ढिकले,रणसिंग पाटील,तानाजी लांडगे,महेश आगे,सुनील ठाकरे,इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत समितीमधील सदस्यांना ग्रामपंचायत बळकट करण्यासाठी आणि त्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्राचा विकास साधण्यासाठी विविध उपयोजनाची चर्चा करण्यात आली.या समितीमध्ये देगलूर तालुक्यातील मौजे येरगीचे सरपंच संतोष पाटील यांना निमंत्रित म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाल्याने पाटील यांचे कौतुक होत आहे.