
दैनिक चालु वार्ता उमरी प्रतिनिधी- श्रीनिवास मुक्कावार
उमरी शहरातील सामाजीक बांधलकी जोपासून राजकीय क्षेत्रातील नेतृत्व जोपसनारे नगरसेवक प्र सोनुभाऊ वाघमारे यांनी इतर बॅर्नर बाजी अनाटाई खर्च टाळून मुखबधीर शाळेत वहया पेना खाऊ देवून वाढदिवस साध्या पद्धतीने उपस्थित मान्यवरा सोबत साजरा केला आहे .
उमरी शहरातील वार्ड प्रभागात असो व तालुक्यात असो नगरसेवक प्र सोनूभाऊ वाघमारे यांच्या सामाजिक कार्याची छाप आहे .
त्यांनी अनेक वेळा वाढदिवस साजरा करतांना सामाजीक उपक्रमाला महत्व देत असतात , स्वच्छता , वृक्षलागवड , दवाखाण्यात रुग्णाला मदत , रक्तदान , गरजूना सामाजिक शैक्षणिक सेवेची मदत , व दरवर्षी पत्रकार यांचा सन्मान करून विशेष भेट देवून गौरवही करतात .
अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रात निस्वार्थ पणे कार्य करणारे सोनुभाऊ वाघमारे यांची उमरी शहरात ख्याती आहे
यदांही सोनुभाऊ वाघमारे बॅनर बाजी स्टंट न करता अनाठाई खर्च टाळून मुकबिधीर शाळेत वहया पेना खाऊ देवून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे .
यावेळी सोनुभाऊ वाघमारे यांच्या सोबत धर्माबाद पत्रकार संघाचे मा . तालुकाध्यक्ष जी . पी . मिसाळे , राज्य पुरस्कार सेवानिवृत शिक्षक जी एम वाघमारे , पत्रकार सुदर्शन वाघमारे , पत्रकार गंगाधर धडेकर , एन एम कांबळे सर,पत्रकार आकाश सैदमवार ,सचिन खंडेलोटे,आझाद सिंग बावरी,विलास लोहगावे,सुनील पिल्लेवाड,गणेश मारावार,प्रकाश सोनपारखे,नितीन वाघमारे,प्रसाद जोंधळे,डुबुकवाड सर,तळेगाये सर,टेकुळवार सर,अनेराये सर,महेंद्र कांबळे,निलेश जोंधळे व मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंध नगरसेवक प्र सोनुभाऊ वाघमारे मित्रमंडळ उपस्थित होते .