
दैनिक चालु वार्ता माळशिरस प्रतिनिधी-प्रा विजय गेंड
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त मतदारसंघातील वेळापूर येथील मुक्काम तळाची महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. जयकुमार गोरे व माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते यांनी पाहणी करून यासंदर्भात संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 30 रोजी आगमन होत आहे. माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होतो. व जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते या ठिकाणी असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होते. या सर्व स्थळांची पाहणी करून वारकऱ्यांना कसल्याही सोयीसुविधा कमी पडून त्यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये म्हणून सोलापूर पालकमंत्री मा. जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते यांनी पाहणी दौरा केला
यावेळी प्रशासकीय अधिकारी, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते येथील ग्रामस्थ उपस्थित होते.