
दैनिक चालु वार्ता माळशिरस प्रतिनिधी -प्रा विजय गेंड
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदारसंघातील कचरेवाडी येथील युवा सहकारी रामभाऊ कचरे व फोंडशिरस येथील विद्यमान सरपंच पोपटराव बोराटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश घेतला.
विकासात्मक व लोकहितकारी कामे लक्षात घेता मतदारसंघात अनेक ठिकाणी कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. हा पक्षप्रवेश कचरेवाडी व फोंडशिरस पंचक्रोशीतील सामाजिक व राजकीय प्रवाहाला नवी दिशा देणारा ठरेल, यात शंका नाही. नव्याने पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा यावेळी विश्वास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री जयकुमार गोरे व माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुनील विष्णू गोरे, वैभव कोळेकर ग्रामपंचायत सदस्य, संतोष ताम्हाणे ग्रामपंचायत सदस्य, रमेश विरकर ग्रामपंचायत सदस्य, सदाशिव कचरे, सागर गायकवाड, सोमनाथ कोळेकर, संजय तरडे, नवनाथ विरकर, नवनाथ जाधव, संतोष विरकर, शंकर कोळेकर, बाजीराव विरकर, सुनील मोटे,नारायण विरकर, शहाजी विरकर, मोहन कोळेकर, राजेंद्र बिचुकले, बंटी ताम्हाणे, दादा तेलंगे, सचिन शेलार, समाधान कोळेकर यांनी पक्षात प्रवेश केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ॲड. बी वाय राऊत, सोपान काका नारनवर, बाळासाहेब वावरे, माळशिरस नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, नगरसेवक शशिकांत बरडकर, नगरसेवक माऊली उराडे बरडकर, नगरसेवक दीपक काळे, नगरसेवक अमित चांगण, नगरसेवक वैभव जानकर, तालुका अध्यक्ष शरद मदने, नातेपुते मंडलाध्यक्ष संजय देशमुख, सोनू भैय्या पराडे, राहुलजी पद्मन, नागेश मालक वाघमोडे, आनंद शेंडगे, रितेश पालवे, अर्जुन दुधाळ, बारामती झटका यूट्यूब चैनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील, नितीन मोरे, महादेव पवार, धर्मा माने, संभाजी माने, राहुल रुपनवर, दत्ता पाटील, सचिन किर्दक, पप्पू बुधावले, हनुमंत शिंदे, सचिन काटकर, किरण गोडसे, देविदास काळे, विनोद काळे, दादा पाटील, मारुती खांडेकर, सोमनाथ मदने, मदन सुळे, अमोल दाहिंजे, आप्पा शिंदे, सतीश पालवे, तानाजी सुरवसे, हर्षद निंबाळकर, पप्पू सूर्यवंशी, सचिन गायकवाड, सचिन कचरे, नवनाथ जाधव, सचिन लवटे, आबा भिसे, संभाजी लवटे, हनुमंत दाहिंजे, शक्ती तोरणे, सुभाष सुदणे, तेजस गोरे, भानुदास चोरमले, शिवाजी गायकवाड, वैभव सुरवसे, ज्ञानदेव तरंगे, सुरज जाधव, विकास ठोंबरे, योगेश दाभाडे, स्वप्निल राऊत, गजानन गोरे, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.