
दैनिक चालु वार्ता म्हसळा -( रायगड )प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – कृषी दिन हा कृषीप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो त्यामुळे कृषी दिनाला विशेष महत्व आहे.१ जुलै रोजी महाराष्ट्र राज्यात कृषी दिन साजरा केला जातो हा दिवस राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म दिवस.त्यांचे जयंती निमित्ताने राज्यात कृषी दिन सप्ताह साजरा करण्यात येतो. म्हसळा तालुका केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात आयोजित कृषी दिन साजरा करण्यात आला.माजी सभापती महादेव पाटील,कृषी अधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.या वेळी सचिव अशोक काते,ग्रंथपाल उदय करडे,कृषि विभाग अधिकारी विनोद सोनावणे, राहुल झडे,नरेश जामकर,खेडकर, परेश नाक्ती,निलेश यादव,अशोक सानप,धनंजय चाटे,अंगणवाडी पर्ववेक्षिका रुपाली पालवे,रुपाली वारुले,योगिता जाधव, प्राची मेंदाडकर आदि मान्यवर उपस्थित होते.या वेळी माजी सभापती महादेव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषि कार्याची महती विषद करताना खऱ्या अर्थाने ते कृषी क्षेत्राचा विकास करून हरित क्रांती निर्माण करून शेतकऱ्यांचा सन्मान करणारे महाराष्ट्राचे नेतृत्व होते.त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित केल्या म्हणूनच त्यांचे जयंती निमित्ताने कृषी सप्ताह साजरा करण्यात येत असल्याचे पाटील सांगितले.