दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -पंडित चौगुले
56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, कोल्हापूर कार्यालयामार्फत माहे सप्टेंबर ते डिसेंबर 2025 पर्यंत एन. सी. सी. भवन, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर या ठिकाणी वेगवेगळी वार्षिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी प्रतिदिन सकाळी न्याहारी, सकाळी चहा बिस्कीट, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा बिस्कीट, संध्याकाळी जेवण हे शिबीर अन्नश्रेणी यादी (मेनू) नुसार पुरवठा करण्यासाठी (प्रत्येक व्यक्ती प्रती दिन) खर्चाचे दरपत्रक मागवण्यात येत आहेत. हे दरपत्रक दिनांक 10 जुलै 2025 पर्यंत समादेशक अधिकारी 56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एन.सी.सी. भवन, दुसरा मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर यांच्या नावे पाठवावीत, असे आवाहन 56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथकाचे कमांडींग अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0231-2694582 या क्रमांकावर संपर्क साधावा.