
दैनिक चालु वार्ता वर्धा -उपसंपादक वर्धा – अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा- आष्टी :- नजिकच्या
पेठ अहेमदपुर आरोग्य उपकेंन्द्रातील कार्यरत आरोग्य सेविका चंदा डोबणे (कुमरे) यांचा मुलगा भुषण गजानन डोबणे याचा पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे आवारातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे “नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयातील” वसतीगृहात २ मे २०२५ रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. गेल्या २ मे रोजी सकाळी मृतक विद्यार्थ्यांच्या आईला पुणे वसतीगृह पर्यवेक्षक शुभम पाठक यांनी फोन द्वारा कळवले की, तुमचा मुलगा वसतिगृहाचे खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडून आहे.तुम्ही पुण्याला यावं त्या कारणे मृतकाची आई ताबडतोब पुण्याकरिता निघाली अवघ्या अर्धा तासानेच दुसरा फोन आला की, भुषण मरण पावला असून तुम्ही लवकरात लवकर पुण्याला पोहचा.भुषणची आई पुण्याला पोहोचल्यानंतर ससुन हॉस्पिटलमधील शवविच्छेदन केंद्रात भुषणच्या मृतदेहाची पूर्ण पाहणी केली तेव्हा त्याला टोंघंड्याजवळ काळ्या स्वरूपाची जखम असल्याचे दिसून आले. आणि वस्तुस्थिती पाहून आईच्या मनात संशय निर्माण झाला आणि भुषणचा मृत्यु हा घातपाताने तर झाला नसावा. शवविच्छेदन करण्यापूर्वी तेथे उपस्थित पोलीसांनी भुषणच्या खोलीत डाॅक्टरांची चिठ्ठी आणि गोळ्या आढळुन आल्याने जप्त केल्याचे सांगितले. आष्टी वरून पुणे ११ तासांचे लांब लचक अंतर असल्याने त्याची आई व आष्टी येथील पत्रकाराने भुषणच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी डेक्कन पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या कडे भ्रमणध्वनी वरून वारंवार चौकशी केली असता,त्यांच्या कडुनही सविस्तर माहिती दिल्या गेली नाही. त्यामुळे या प्रकरणात आई चंदा डोबणे (कुमरे) यांची वसतीगृह प्रशासनावर आणि पोलीस प्रशासनावर संशयाची नजर गेली होती.
या प्रकरणाची विधानपरिषद आमदार दादाराव केचे यांनी तातडीने दखल घेतली. आणि दिनांक ३ जुन रोजी विधानपरीषद सभागृहात या प्रकरणात सविस्तर उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले.
माझा मुलगा भुषण डोबणे याचा संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी होऊन त्याच्या मृत्युचे मारेकरी कोन हे पुढे आल्यास हीच त्याला खरी श्रध्दांजली राहिल.
चंदा डोबणे(कुमरे)
मृतक विद्यार्थ्यांची आई