
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक-अवधूत शेंद्रे
वर्धा- आर्वी :- तालुक्यातील
बोथली (किन्हाळा ) येथील प्राथमिक शाळेत १ ते ८ वर्ग असून तेथे फक्त ४ शिक्षक कार्यरत आहे पटसंख्या जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचा नुकसान होत आहे त्यासाठी संबंधित शालेय व्यवस्थापन समितीने सदर बाब लक्षात घेऊन शिक्षकाची रिक्त जागा भरण्यात यावी यासाठी अति तातडीने मागणी केलेली असून
वारंवार पत्र व निवेदन देऊन सुद्धा प्रशासन जागा होत नाही त्यासाठी गोर सेनेच्या वतीने आज गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्वी यांना निवेदन देऊन शिक्षकाची व्यवस्था करावी अन्यथा गोर सेनेच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला
आहे व शिक्षक रामेश्वर सुरकार यांचे समायोजन अति तातडीने रद्द करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी गोर सेना नागपुर विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड़, बादल राठोड़ गोर सेना तालुका सचिव गिरधर पवार, पंकज अवथलळे अध्यक्ष शिक्षण समिती मुकेश चव्हाण उपाध्यक्ष शिक्षण समिती पंकज लांडगे किशोर बाळनोत रवींद्र चौकोने आशाताई दखणे इत्यादि होते
सदर निवेदनाबाबत आर्वी गटशिक्षणाधिकारी पद्मा तायडे यांना भ्रमणध्वनी केला असता प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्यांची बाजू मांडता येत नाही
प्रस्तुत प्रतिनिधी