
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी – किशोर फड
बीड/अंबाजोगाई
श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई पाचवी ते सातवी विभागांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त सातवी अ वर्गाच्या विद्यार्थ्यांनी ‘आषाढी वारी’ हा विषय घेऊन परिपाठ सादर केला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनंतराम कोपले, उपमुख्याध्यापक श्री.विवेक जोशी, पर्यवेक्षक श्री.प्रशांत पिंपळे, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख सौ.ज्योती शिंदे, सातवी अ वर्गाच्या वर्गशिक्षिका सौ.अश्विनी सूर्यवंशी व सर्व कर्मचारी हे उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अशा प्रकारचा परिपाठ सादर केला व काही वर्गातील विद्यार्थ्यांनी आषाढी वारी निमित्त विविध भक्ती गीताचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कोपेले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.