
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी-एकनाथ गाडीवान
देगलूर. तालुक्यातील देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी कर्तव्यदक्ष म्हणून काम करत असताना, ऑपरेशन प्लस आउट “अंतर्गत मागील ०९ महिन्यात राज्यात प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित) गो हत्या बंदी कायदा व प्राणी अत्याचार अधिनियम आणि तत्सम कायद्याची योग्य प्रकारे कठोर अंमलबजावणी करून 26 गुन्हे दाखल करू शेकडो अबोल जीवांचे व गोवंशाचे संरक्षण करून येथे एकही वंशाची कत्तल न होता असे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधींनी पोलीस स्टेशन देगलूर येथे येऊन अभिनंदन पत्र प्रशासन पत्र देऊन सत्कार करण्यात आला. गोरक्षणाचे काम अतिशय चोखपणे करून नावलौकिक मिळवलेल्या मारुती मुंडे यांचे महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाकडून कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले, असून गोरक्षणाचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुंडे यांच्या कार्याचा गौरव आयोगाच्या वतीने करण्यात आला. महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अशासकीय सदस्य मा. उद्धवजी नेरकर यांनी शासनातर्फे पोलीस निरीक्षक श्री.मारुती मुंडे यांना पाठवलेल्या गौरव पत्रात म्हटले आहे की,आपल्या राज्यात प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ सुधारित व प्राणी अत्याचार अधिनियम कायदा आणि तत्सम कायदे अस्तित्वात आहेत.आपल्या माध्यमातून व कार्य कुशल कर्तृत्वातून अनेक गोरक्षकांनी गोवंश वाहतुकीच्या किंवा अन्य सूचना दिल्या असतात आपण लगेच त्यावर नियमानुसार कारवाई केली,कोणत्याही राजकीय दडपणाखाली न येता कारवाई करून आरोपींना तात्काळ अटक केली व अनेक अबोल जीवांचे रक्षण केली.महाराष्ट्र शासनाने देसी भविष्याचे धार्मिक आर्थिक,सामाजिक,व वैज्ञानिक महत्त्व बघता देशी गाईला राज्य मातेच्या दर्जा सुद्धा दिलेला आहे.महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाच्या माध्यमातून सुद्धा अनेक उपक्रम राबविले जात आहेत.शासकीय सेवक असताना सुद्धा आपण पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाच्या गोवंश हत्याबंदी कायद्याचा कडक व योग्य अंमलबजावणी केली.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.असे गोरक्षकदार आयोगाकडून करण्यात येऊन यापुढेही आपल्याकडून अशीच कारवाई अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक मारुती श्रीराम मुंडे यांचे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रांत गोशाळा संपर्कप्रमुख किरण सुभाषराव बिच्चेवार,हिमायतनगर, मारुती वडजे, बजरंग दल प्रखंड संयोजक, अतुल बिच्चेवार प्रखंड गोरक्षा प्रमुख,गणेश यशवंतकर,योगेश वाकोडे,शैलेश गोगुलवार व इतरांनी भेट घेऊन सन्मानपत्र देऊन मनःपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील अनेक गोरक्षक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.