
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी – पंडित चौगुले
कोल्हापूर दि. 5 आषाढी एकादशी निमित्त हुपरी ते प्रति पंढरपूर नंदवाळ पायी दिंडी आज कोल्हापुर येथे राजाराम पुरी मध्ये आली असता माननीय सौ. अनुराधा अरुण देवकुळे मॅडम (राष्ट्रवादी पक्ष महिला आघाडी अजित पवार दादा गट )यांनी दिंडीचे स्वागत करून दिंडीमध्ये डोक्यावर तुळस कट्टा घेऊन रिंगणात सहभागी होऊन वारकरी यांच्या आनंदात सहभागी झाल्या यावेळी राजारामपुरीतील वारकरी श्री धनाजी शिंदे, दाविद भोरे, प्रशांत अवघडे,सतीश कांबळे, सतीश रास्ते, आदिनाथ साठे व समाजातील महिला वर्ग सहभागी होता रिंगण झाल्यानंतर दिंडी पुढे प्रति पंढरपूर रवाना झाली.