दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – तुषार नाटकर
पैठण
छत्रपती संभाजीनगर (पैठण): आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पैठण शहरात पोलीस प्रशासनातर्फे भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.
या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, 4 पोलीस अधिकारी, 80 पोलीस अंमलदार तसेच होमगार्ड दलाचे जवान सहभागी झाले होते.
रूट मार्चदरम्यान पोलिसांनी शहरातील विविध मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक काढली. या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करताना, असामाजिक तत्वांना कडक इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सण-उत्सवांच्या काळात शहरात शांतता व अनुशासन टिकवून ठेवण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरत असून, पोलीस प्रशासन सतर्क व सज्ज असल्याचे या रूट मार्चमधून स्पष्ट झाले.
