
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर ( पैठण): तालुक्यातील पाटेगाव येथील कौशल्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 5 जुलै रोजी राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या कबड्डी व कुस्तीतील खेळाडूंचा आणि शालांत परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अनिल पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष प्रा. चंद्रकांत गायकवाड, कोषाध्यक्ष विशाल सुरासे, सरपंच गोकुळ रावस, व वर्गमित्र विकास सेवामंडळचे पदाधिकारी उपस्थित होते.
अमोल टेके, तुषार डांगे (कबड्डी) व तृप्ती भवर (कुस्ती) या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
SSC व HSC परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य निलेश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन नारायण औटे, तर आभार प्रदर्शन बालाजी नलभे यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.