
दैनिक चालु वार्ता म्हसळा -( रायगड )प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत म्हसळा तालुका शेकाप जोमाने उतरून पक्षाची ताकद दाखविणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचीत तालुका चिटणीस विनायक गिजे यांनी आयोजीत कार्यकारणी बैठकीत मनोगत व्यक्त करताना सांगितले.पक्ष प्रमुख भाई जयंत पाटील यांनी म्हसळा तालुक्यात पक्षाची नविन कार्यकारीणी जाहीर करून आम्हा कार्यकर्त्यांवर जो विश्वास दाखवला आहे त्याला आम्ही कदापी तडा जाऊ देणार नाही.भाई जयंत पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागावे,तळागाळातील जनतेच्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन विनायक गिजे कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पक्ष प्रमुख भाई जयंत पाटील यांचा येत्या ७ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवासाला व २ ऑगस्ट २०२५ रोजी पक्षाच्या आयोजित वर्धापन दिनासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करून मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका शेकाप चिटणीस विनायक गिजे यांनी यावेळी केले. पक्षाचे बैठकीला जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य वसिम कोदरे, माजी जिप.सदस्या तथा माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्या गौरीताई पयेर, तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र गिजे,शेतकरी सभेचे अध्यक्ष राजाराम धुमाळ,सह चिटणीस एकनाथ खामगावकर , कार्यालयीन चिटणीस सूर्यकांत तांबे,अन्वर हजवाने,संजय दळवी, किसन पवार,रामचंद्र पोस्टुरे,महादेव घाणेकर,भालचंद्र घाणेकर,काशिनाथ पाटील,गोविंद बोर्ले,शांताराम चौकेकर,अनंत मेंदडकर,रामचंद्र लोणशीकर, सचिन दिवेकर,सचिन सुतार,कानू लोणशीकर,जाहीद जमादार,जयेश मुंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचालन सुर्यकांत तांबे यांनी जितेंद्र गिजे यांनी आभार मानले.