
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी – रवी राठोड
पालघर : दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यां, नाले, ओहोळ तसेच पुला वरून पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. इंदु राणी जाखड यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले
आज दिनांक 5.7.2025 रोजी भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त अंदाजानुसार पालघर जिल्ह्यासाठी दिनांक 5 व 6 जुलै 2025 रोजी “ऑरेंज अलर्ट” देण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. इंदु राणी जाखड यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले
दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यां, नाले, ओहोळ, पूला वरून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये. विद्यार्थ्यांसमोर पुराच्या पाण्यातून पलीकडे जाण्याची परिस्थिती असेल तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना परिस्थिती विषयी अवगत करावे .झाडावरून टायरच्या ट्युब वरून किंवा राफ्ट वरून प्रवास न करता
नियमित रस्त्याचा वापर करावा शार्टकट मार्ग म्हणून धोकादायक रित्या पाण्यातून प्रवास करु नये. नियमित रस्ताही पाण्याखाली गेला असल्यास पोलीस तसेच तालुका प्रशासन यांच्या परवानगीशिवाय प्रवास करू नये व आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. इंदु राणी जाखड यांनी विद्यार्थ्यांना , विद्यार्थ्यांच्या पालकांना तसेच जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.