
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -पंडित चौगुले
कोल्हापूर
कोल्हापुरातील पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळ गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ओळखले जाते आज दिनांक 06 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी निमित्त खूप मोठ्या यात्रेचे स्वरूप निर्माण होते त्यानिमित्य शहरातील विविध दिंड्या पायी प्रति पंढरपूर नंदवाळा जात असतात वारकरी भक्तांना फराळ वाटपाचे सामाजिक कार्यकर्ते स्टॉल्स टाकून त्यांच्या स्वागतासाठी व फराळ देण्यासाठी उपस्थित असतात.
क्रेशर चौकात माननीय सभापती स्थायी समिती अध्यक्ष शारंगधर देशमुख साहेब संजय सावंत साहेब यांनी वारकऱ्यांचे स्वागत व फराळ वाटप केले व स्वागत करण्यासाठी उपस्थित होते तसेच तुळजाभवानी साने गुरुजी बस स्टॉप वर माननीय माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच पुढे माननीय माझी नगरसेविका सौ संगीता संजय सावंत यांनी आरोग्य सेवा व फराळ वाटूप करत उपस्थिती त्यांनी सुद्धा दाखवली. माजी आमदार ऋतुराज पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री सचिन भाई चव्हाण व निष्ठावंत कट्टर कार्यकर्ते यांच्यासह खिचडी व चहाचे वाटप करण्यात आले यावेळी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रति पंढरपूर नंदवाळ विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ ओबीसी जन मोर्चा आणि ओबीसी बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्ष सौ मीनाक्षी डोंगर साने, शिवाजी माळकर जिल्हाध्यक्ष, सिंधुताई बडवे, सीमा मोदानी, दिपाली कोळी, सीमा भैरवा, देवापा अंबी, शितल महाजन, काजल तारदाळकर यांनी मंदिराच्या परिसरात फराळ, तुळस, फुले,बुक्का,खिचडी असे वाटप केले