मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती पाहण्यास मिळू शकते.
उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले की एकत्र राहण्यासाठी एकत्रित आलो आहेत. विजयी मेळावा शनिवारी झाली. या मेळाव्याला दोन दिवस होत नाहीत तोच राज ठाकरेंनी मोठे पाऊल उचलले आहे.
राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी, प्रवक्ते, नेते यांना स्पष्ट सूचना करत सांगितले आहे की, मीडिया, समाजमाध्यमांसोबत बोलण्याच्या आधी त्यांच्या परवानगी घेणे आवश्यक आहे. राज ठाकरेंच्या या निर्णयामुळे मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होत असताना चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून काळजी घेतल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरेंचे विजयी मेळाव्यातील भाषण हे मुद्देसुद्धा होते. त्यांनी मराठीच्या मुद्यावरून आपला फोकस हालू दिला नाही. तरी देखील त्यांनी आपल्या शैलीत हिंदीचे समर्थन करणाऱ्यांचा तसेच ठाकरे परिवारावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीबाबत ते स्पष्ट बोलले नाहीत. मात्र, आपण एकत्रित आल्याचे त्यांनी सांगितले.
एप्रिलमध्येही राज यांनी दिलेल्या सूचना
राज-उद्धव ठाकरे एकत्रित येण्याच्या चर्चा एप्रिल महिन्यात सुरू झाल्या होत्या. या चर्चा सुरू झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुट्टीसाठी परदेशी गेले होते. त्यावेळी मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेपक्षातील युतीबाबत मनसे नेत्यांकडून विरोधात वक्तव्य केली जात होती. त्यावेळी देखील राज यांनी परदेशातून सूचना करत या मुद्यावर न बोलण्याची तंबी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली होती.
