
दैनिक चालू वार्ता उप संपादक धाराशिव- नवनाथ यादव
धाराशिव/भूम (प्रतिनिधी):
पाथरूड येथील जिल्हा परिषद शाळेत आपुलकी सामाजिक संस्थाचा आठवा वर्धापन दिन दिनांक ७ जुलै रोजी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात भूम तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या संस्थेने वर्धापन दिनानिमित्त समाजाभिमुख विचारांना चालना दिली.
कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. चेतन बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. समाजहितार्थ सातत्याने कार्य करत राहण्याची गरज व्यक्त करताना, “विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,” असे डॉ. बोराडे यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जनार्दन काटे, शिक्षकवृंद, शिक्षिका, विद्यार्थी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजेंद्र दरंदले यांनी संस्थेची स्थापना, तिची वाटचाल, कार्यक्षेत्र आणि भावी योजनांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेच्या अध्यक्षा सविता राजेंद्र दरंदले यांनी केले