
दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव-नवनाथ यादव
📰 धाराशिव/ भू म :-राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने भूम, परांडा व वाशी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात नियोजन बैठक शुक्रवार, दि. ११ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता जय भवानी कॉम्प्लेक्स, एस.टी. स्टँड समोर, भूम येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. अजितदादा पाटील असणार आहेत.बैठकीस नानासाहेब मदने (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), आश्रुबा कोळेकर (अध्यक्ष मराठवाडा), अँड. विकास पाटील (धाराशिव जिल्हाध्यक्ष), पांडुरंग लोकेरे (जिल्हा संघटक, धाराशिव), तसेच पंडित मारकड (धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीचे आयोजन संतोष हराळ (भूम तालुका अध्यक्ष), मनोज पांडुळे (परांडा तालुका अध्यक्ष) आणि विशाल कोरडे (वाशी तालुका अध्यक्ष) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमास भूम, परांडा व वाशी तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून निवडणूक तयारीस बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.