दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
तालुक्यातील पाडळी दुधा ग्रामपंचायतमध्ये मातोश्री पाणंद रस्त्याचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू असल्याने दर्जेदार काम करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. मात्र कंत्राटदाराच्या ताटाखालचे मांजर झालेल्या रोजगार साह्यक, तांत्रिक साह्यक इतर अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यावर ग्रामस्थांनी सदर रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून कामात बेजबाबदारपणे काम करणाऱ्या रोजगार सेवक व तांत्रिक सहाय्यक यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ प्रसाद घुगे व बालासाहेब घोरसड यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती मात्र गटविकास अधिकाऱ्याने तक्रारीकडे दूर्लक्ष केल्यामुळे तक्रार दाराने उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे चौकशी त्वरित करा नसता आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करण्यास विलंब केल्यामुळे तक्रारदार उपोषणास बसले असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करण्याच्या आश्वासनवर उपोषण मागे घेण्यात आले १६ जानेवारी रोजी जाफराबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण खिलारे त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी समिती नेमून जाय मोक्यावर जाऊन तक्रारदारा समक्ष २३ जानेवारी २०२५ रोजी पाणंद रस्त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले चौकशी समितीने चौकशी केली मात्र तक्रारदारास उडवा -उडवीचे उत्तर देऊन चौकशीची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे दोषी कर्मचाऱ्यास वाचवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे तक्रारदारास चौकशी समितीवर कामावर शंका निर्माण झाली त्यांनी परत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी समिती विषयी व रस्त्याच्या बोगस कामाविषयी तक्रार केली त्या अनुषंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या दालनासमोर सुनावनी ठेवली सुनावणी दरम्यान तक्रारदार अनुपस्थित असल्यामुळे कोणताही निर्णय घेता आला नाही अनुसंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दी 3 जुलै २०२५रोजी पत्र काढले की पाडळी दुधा रस्ता प्रकरणी दिनांक नऊ जुलै रोजी पाडळी दुधा ग्रामपंचायत येथे स्वतः येऊन चौकशी करणार आहे. पत्रात नमूद केले की
तक्रारदारांच्या ११ पत्राचा संदर्भा विषयाच्या अनुषंगाने तक्रारदार श्री. बाळासाहेब घोरसड रा. पाडळी दुधा ता. मंठा जि. जालना यांनी ग्रामपंचायत पाडळी दुधा ता. मंठा जि. जालना येथील मग्रारोहयो कामांच्या चौकशी अहवाला बाबत यांनी तक्रार अर्ज या कार्यालयास सादर केलेला आहे. सदर प्रकरणात माझ्या दालनात दि. 09/06/2025 रोजी सुनावणी घेण्यात आली सदर सुनावणीच्या अनुषंगाने तक्रादार हे अनुपस्थित असल्याने तक्रारीवर निर्णय घेता आलेला नाही. त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, सदर प्रकरणी मौजे. पाडळी दुधा ता.मंठा येथे दि.९/०७/२०२५ रोजी मी प्रत्यक्ष भेट देणार आहे. करीता आपण सादर केलेल्या मातोश्री पांदन रस्ता व इतर सार्वजनिक कामाच्या तपासणी करण्यासाठी आवश्यक त्या खालीलप्रमाणे दिलेल्या माहितीसह ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी उपस्थित रहावे.
1. शासनाकडील मंजुरी आदेश, अंदाजपत्रक, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश
2. हजेरीपत्रके 1 ते 7 रजिस्टर कामाची देयके
3. मोजमाप पुस्तिका, कुशल देयके
4.जिओ टॅगिंग फोटो, कामापूर्वीचे, काम सुरु असतानाचे व कामपूर्णचे
5.कामांची गुणवत्ता चाचणीचे अहवाल 6 तक्रार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, ग्राम पंचायत अधिकारी, सरपंच, गट विकास अधिकारी यांचे
7.माहितीफलक फोटो, ग्राम पंचायत अधिकारी, सरपंच सहित,तसेच सदर चौकशीसाठी संबधित अधिकारी / कर्मचारी यांना आपल्यास्तरावरून उपस्थित राहणे बाबत सूचना उदयसिंग राजपूत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं) तथा उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो) जिल्हा परिषद जालना यांनी दिल्या आहे. या चौकशीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.