दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनिधी –
उमरगा (धाराशिव)
राज्य परीक्षा मंडळ आयोजित जून- जुलै 2025 एस एस सी आणि एच एस सी बोर्ड परीक्षा आयोजित करण्यात आले होते.
लातूर विभागीय परीक्षा मंडळ लातूरच्या वतीने एसएससी बोर्ड परीक्षा पेपर मूल्यांकन करण्यासाठी उत्तम नियोजन करून, दोनच दिवसात वेळेत पेपर तपासणी कामी विषयानुसार शिक्षकांना नियुक्त करण्यात आले होते.
त्यामध्ये विज्ञान भाग 2 विषयाचे बोर्डाचे मुख्य नियमक मनोजकुमार गुरव सर आणि त्यांची टीम दोनच दिवसात पेपर तपासणीचे काम पूर्ण केल्याबद्दल
एसएससी विभागाचे अधीक्षक चंद्रकांत जेवळीकर साहेब, व विभाग प्रमुख श्रीमती गायकवाड मॅडम यांच्या वतीने श्री मनोजकुमार गुरव सर. प्रदीप राऊत सर
लक्ष्मणराव सूर्यवंशी सर सचिन मिटकरी सर बसवराज चिटटे सर सविता बोरफळकर मॅडम श्रीमती वाघ मॅडम
किरण राऊत सर या पॅनलचे उत्कृष्ट आणि वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल विज्ञान विभागाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
सदर टीमचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर तेलंग साहेब सचिव श्रीमती भंडारी मॅडम यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले
