
गोपीचंद पाडळकरांचा सूचक इशारा…
विधानसभेचे 2025 चे पावसाळी अधिवेशन सध्या वादळी ठरत आहे. 16 आणि 17 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वैमनस्याने विधानभवनात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली.
या घटनेनंतर गोपीचंद पडळकरांनी आज (18 जुलै) माध्यमांशी संवाद साधताना सूचक इशारा दिला आहे, “जास्त बोलायला लावू नका. मी शांत आहे, याचा वेगळा अर्थ घेऊ नका. कोण किती धुतल्या तांदळाचा आहे, हे मला माहिती आहे. माझ्याकडे डॉक्युमेंट आहे. पण मला सूचना म्हणून मी शांत आहे.” या वक्तव्यमुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे.
गोपीचंद पडळकरांचा सूचक इशारा
17 जुलै रोजी विधानभवनाच्या लॉबीत आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात कॉलर धरणे, शिवीगाळ आणि कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली. आव्हाड यांनी दावा केला की, पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली आणि स्वतःला मारण्याचा नियोजित कट रचला गेला. यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, आणि आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गोपीचंद पडळकरांनी 18 जुलै रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे खेद व्यक्त केला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुकीसाठी दिलगिरी व्यक्त केली. तथापि, त्यांनी माध्यमांशी बोलताना, “जास्त बोलायला लावू नका. मी शांत आहे, याचा वेगळा अर्थ घेऊ नका,” असा सूचक इशारा दिला. त्यांनी “माझ्याकडे डॉक्युमेंट आहे” असेही म्हटले, ज्यामुळे त्यांच्याकडे आव्हाड किंवा अन्य विरोधकांविरुद्ध काही पुरावे असू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.