
म्हणाले; निवडणुकाजवळ आल्यानंतर…
हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा घेऊन 15 दिवस झाले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेली मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची राजकीय युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इगतपुरी येथील मनसेच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे युतीबाबत काही बोलणार का? याकडे लक्ष लागले होते. मात्र, ते काहीच बोलले नाहीत. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठे विधान केले आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी केली जाणार अशी विचारणा पत्रकाराकडून यावेळी करण्यात आली होती. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सध्या आम्ही दोघेजणही मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलो आहोत. त्यामुळे सध्या आम्ही एकच आहोत. आम्ही दोघांनीही मेळाव्यात तशी घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाजवळ आल्यानंतर आमच्यात राजकीय युतीबाबत बोलणी सुरु होईल,’ असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली.
हिंदी सक्तीबाबत मी कोणतेही अंमलबाजवणी केली नव्हती. माशेलकर अहवाल सादर केला पण स्वीकारलेला नाही. त्यामुळे कोणत्याही राज्यात कोणत्याही भाषेची सक्ती लागू होऊ देणार नाही. त्यासोबतच राज्यात हिंदी भाषेची सक्ती करू देणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेवेळी केली.
विधानभवनातील मारहाणीच्या घटनेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी सत्तेचे माजकारण सुरू असल्याची टीका सरकारवर केली. राज्यात जे घडतंय त्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी घेतलीच पाहिजे. राज्यातील समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. लोकशाहीचा खून करणारे विधिमंडळात वावरत आहेत. सत्तेच्या लालसेपोटी राजकारण्यांनी गुंडांना पक्षात घेतले, अशी टीका ठाकरेंनी केली.
दरम्यान, इगतपुरी येथील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे युतीबाबत काही बोलणार का? याकडे लक्ष लागले होते. मात्र, ते काहीच बोलले नाहीत. तर शुक्रवारी सायंकाळी राज ठाकरे यांची सभा मीरा- भाईंदर येथे होणार आहे. त्या सभेवेळी ते युतीबाबत काही वक्तव्य करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.